Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी ः स्नेहलता कोल्हे

कोपरगाव - कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.अत्यल्प पर्जन्यमान असून तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही.दुसरीकडे पाणी

 शितलकुमार गोरे  समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)
दोन पोलिस एकमेकांना भिडले…सीसीटीव्हीत कैद झाले

कोपरगाव – कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.अत्यल्प पर्जन्यमान असून तालुका दुष्काळाच्या यादीत बसला नाही.दुसरीकडे पाणी नसल्याने हंगाम हातातून जाण्याची परिस्थिती आहे त्यामुळे तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक होण्याची सूचना आपण करावी अशी मागणी मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कालवे व वितरण व्यवस्था याची कामे मार्गी लागणे व कालव्यांची वहन क्षमता वाढणे आवश्यक होते. मात्र अद्याप त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही,तरीही कार्यान्वित यंत्रणेस आदेश होऊन शेतकरी हिताचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे .शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात पाऊस कमी झाल्याने अडचणी आणि संकटे अधिक आहेत.आधीची पिके हातची गेली आता भविष्यात अंधार होऊ नये याची काळजी घेत पाणी वाटपाचे नियोजन चोख होणे आवश्यक आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन किती आवर्तन देणार आणि कसे वितरण होणार यावर व्यवस्थित नियोजन अधिकारी वर्गाने करने गरजेचे आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जलसंधारणाची कामे झाल्याने दुष्काळाच्या झळा कमी जाणवत असल्या तरीही आगामी काळ खडतर असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवणार आहे.शेतीसह पशुधन अडचणीत येणार आहे त्यामुळे तातडीने कालवा सल्लागार समिती बैठक व्हावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – नगर नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य स्थिती असून दुष्काळ सर्वेक्षण झाले त्यात अनेक तालुके वगळले गेले आहेत. तरीही फेर आढावा घेऊन कोपरगाव तालुका दुष्काळाच्या मदत यादीत सहभागी करावा अशीही मागणी पुनश्‍च एकदा कोल्हे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

COMMENTS