Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे

कोपरगाव ः श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि सभासदांच्या पाठिंब्याने कारखाना सुरू झाला. संजीवनी आणि संगमनेरच्या मदतीने कारखाना चांगल्या क्षमतेने गळी

पुणतांबा परिसरातील बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे ः विवेक कोल्हे
कर्मवीरांची स्वावलंबनाची शिकवण काळाची गरज ः विवेक कोल्हे
मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज ः विवेक कोल्हे

कोपरगाव ः श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि सभासदांच्या पाठिंब्याने कारखाना सुरू झाला. संजीवनी आणि संगमनेरच्या मदतीने कारखाना चांगल्या क्षमतेने गळीत सुरू राहील. प्राथमिक चाचणी झाली तेव्हा कारखाना अधिकार्‍यांनी सांगितले की, एवढा सुरळीत कारखाना गेले नऊ दहा वर्षात कधीच चालला नव्हता असा आशावाद व्यक्त केला. परिसरात बैलगाड्या दिसल्या आनंद वाटला, तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठीच आलो असे प्रतिपादन गणेश कारखाना लक्ष्मीपूजन प्रसंगी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
युवानेते विवेक  कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन पार पडले त्या प्रसंगी संवाद साधताना पुढे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 10 किलो साखर मोफत दिली. गेले काही वर्ष कर्मचार्‍यांना दुय्यम वागणूक मिळत होती.दिलेल्या शब्दाप्रमाने सभासदांना बंद झालेली साखर आपण पुन्हा सुरू केली. 8.33 ऐवजी 9% बोनस दिला. शिवाय दोन पगार देता आले यामुळे बाजारपेठेत हालचाल वाढली. आम्ही आपल्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो आहोत. दुष्काळी परिस्थिती असली तरी गाळपाचे उद्दिष्ठ गाठू. जरीही अनेक संकटे समोर आले तरीही हंगाम निर्विघ्नपने पार होऊन वाटचाल सुरू राहील. आगामी काळात देखील प्रत्येक लक्ष्मीपूजनाला आपली भेट घडत राहून कारखान्याच्या लक्ष्मीत भर व्हावी. दीपावलीच्या सर्व संचालक मंडळाला, सभासद, उस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व सर्वांच्या परिवाराला शुभेच्छा विवेक कोल्हे यांनी या प्रसंगी दिल्या. माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी सन 1989 साली सुरू केलेली परंपरा गत काही वर्ष बंद होती ती पुन्हा सुरू करून श्री गणेश कारखाना लक्ष्मीपूजन पार पडले ते पुढेही अखंड सुरू रहावे अशी अपेक्षा सभासद शेतकरी, कामगार यांनी या प्रसंगी विवेक कोल्हे यांच्याकडे व्यक्त केली. या प्रसंगी चेअरमन सुधीर लहारे,व्हा. चेअरमन विजय दंडवते,गंगाधर चौधरी,धनंजय जाधव,शिवाजी लहारे,संजय शेळके,वसंत लभडे,भाऊसाहेब चौधरी,शरदनाना थोरात,सुरेश गमे,डॉ.एकनाथ गोंदकर,रामचंद्र बोठे,जयराज दंडवते,भाऊसाहेब थेटे,दिलीपराव क्षीरसागर,विक्रम वाघ,अरविंद फोफसे,चांगदेव कदम,सर्जेराव जाधव,बलराज धनवटे आदींसह आजी माजी संचालक,सभासद,अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभासद,कर्मचारी व गनेश परिसरातील नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी घेतलेले निर्णय सकारात्मक ठरले असून सर्व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर अनेक वर्षांनी अतिशय ओसंडून आलेले हास्य आणि आनंद पाहून समाधान वाटते आहे.  विवेक कोल्हे

COMMENTS