केज प्रतिनिधी - केज येथे पूर्वीग्रामपंचायत होती.त्यानंतरनगरपंचायत झाली व नगरपंचायत होऊन बरेच वर्षे झाले आहेत.आता केजला काही दिवसात नगर परिषदेच्य
केज प्रतिनिधी – केज येथे पूर्वीग्रामपंचायत होती.त्यानंतरनगरपंचायत झाली व नगरपंचायत होऊन बरेच वर्षे झाले आहेत.आता केजला काही दिवसात नगर परिषदेच्या दर्जा मिळणार आहे.केजला ग्रामपंचायत असताना केज हे गाव छोटेसे होते.त्यावेळेस केजची लोकसंख्या ही मर्यादित होती.केजला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्या नंतर ग्रामीण भागातून अनेक नागरिक केज येथे येऊन स्थायिक झाले आहेत.त्यामुळेआत्ता केजची लोकसंख्यामोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
पूर्वीच्या व आताच्या लोकसंख्येच्या आधारे आता काही दिवसात केजला नगरपरिषदचा दर्जा मिळणार आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस ग्रामीण भागातून नोकरदार,व्यवसायीक यांच्यासह अनेक नागरिक मुलाचे शिक्षण विविध कारणासह शहरात येत आहेत.प्रत्येक नागरिकांच्या घरामध्ये दोन चाकी मोटरसायकल व चार चाकी गाडीसह मोठमोठे वाहने आहेत. गेल्या महिन्यात शासनाने शहरातील अतिक्रमण काढले आहेत तरी शहरां मध्ये रस्त्याच्या कडेने पायी चालताही येत नाही. शहरातून दोन राज्य महामार्ग गेल्यामुळे मोठ्या वाहनाची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरांमध्ये व परिसरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.अपघातामध्ये अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत.टाकळी फाटा ते चिंचोली फाटा मार्गे अंबेजोगाई रोड वरील पाण्याच्या टाकी पर्यंत व टाकळी फाटा ते तांबवा मार्गे अंबेजोगाई रोड वरील पाण्याच्या टाकी पर्यंत शहराच्या दोन्ही बाजूने बायपास केल्या नंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी चर्चा नागरिकांतून ऐकण्यास येत आहे.केज शहरातील लोकसंख्येचा व वाहनाच्या रहदारीचा विचार करून लोक प्रतिनिधींनी शहराच्या दोन्ही बाजूने बायपास व शहरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी ही मागणी नागरिकांतून केली जात आहे.
COMMENTS