Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज कानडीमाळी लव्हुरी येवता चौफळा रस्त्याच्या दुरुस्तीचे थातूरमातूर काम रस्त्यावर भले मोठमोठे खड्डेच खड्डे

शांताबाई तापडिया इंग्लिशस्कूलच्या समोर रस्त्यावर तलावाचे स्वरूप

केज प्रतिनिधी - केज शहरापासून तालुक्यातील येवता, जिवाचीवाडी,लव्हुरी कानडीमाळी,साबला, धर्माळा,तरनळी,नागझरी, कोल्हेवाडी या ग्रामीण भागातील गावांना

मनसेचं खळ्ळखट्याक… ठाण्यात टोलनाका फोडला…
विधानपरिषदेत कोण मांडणार अर्थसंकल्प ?
 दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामास प्रारंभाने मोठे समाधान : आ.काळे

केज प्रतिनिधी – केज शहरापासून तालुक्यातील येवता, जिवाचीवाडी,लव्हुरी कानडीमाळी,साबला, धर्माळा,तरनळी,नागझरी, कोल्हेवाडी या ग्रामीण भागातील गावांना जाणारा हा मुख्य रस्ता आहे.गेल्या दोन महिन्यां पूर्वी रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते मात्र चालाख गुत्तेदाराने रोडचे खड्डे पडलेले बुजवले खरे पण डांबराने नाही नुस्ती खडी टाकून खड्डे बुजवले खरे परंतु पहिल्याच पावसाने सदरील बुजवलेल्या खड्ड्यामधील खडी निघून गेली तर काही ठिकाणी तर भले मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या रस्त्यांनी खड्ड्यातून गाडी चालवताना मोठ्या वाहनाचे चालक व दोन चाकी मोटर सायकल स्वारांना करावी लागते मोठी तारेवरची कसरत.

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याचीशक्यता नाकारता येत नाही तरी असे निकृष्ट दर्जाचे काम करणार्या एजन्सीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणीवरील गावातील नागरिकांतून चर्चा ऐकण्यास येत आहे. तसेच या रोडच्यादुरुस्तीचे काम तात्काळ सदरील गुत्तेदाराकडुन करुन घ्यावे अशी जनतेतून मागणी केली जात आहे. तरी सदरील काम तात्काळ नाही झाल्यास संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांतून केली जात आहे.सदरील रस्त्यावरील खड्डे बुजण्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी लोक प्रतिनिधी लक्ष देतील काय ? याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांच्या दोन चाकी मोटरसायकल स्लीप होऊन अपघात घडले आहेत तरीही लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवाल ग्रामीण भागातील नागरिकात उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी हे निवडून येण्यापुरतेच ग्रामीण भागात फिरतात एकदा का मतदान होऊन गेल्या नंतर ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यास त्यांना वेळ मिळत नाही का?अशी चर्चा अनेक गावातील नागरिकांतून ऐकण्यास येत आहे.

COMMENTS