Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशोत्सवापूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राज्यात अजित पवार गट सत्तेत सहभागी होवून अनेक दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पा

पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक
पडसा व सायफल येथे अवैध वाळू वाहतूक जोमत महसूल व पोलीस प्रशासन कोमात
भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राज्यात अजित पवार गट सत्तेत सहभागी होवून अनेक दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते, मात्र गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री देखील निवडले जातील असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, पण आम्ही देखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचा देखील खारीचा वाटा आहे. यावेळी सभेसाठी कोल्हापुरात आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, 2004 ला राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाला असता, पण का संधी गमावली माहित नाही, ज्यांचे जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल, आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांनाच वाटते असे त्यांनी म्हटले आहे. हे सरकार शेतकर्‍यांसाठी संवेदनशील आहे. मला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची कीव येते. काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे. उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेत आहेत. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे. तटकरे म्हणाले की, तपोवन मैदानात सभा घेण्याचा धाडस हसन मुश्रीफ करु शकतात. उत्तर देण्यासाठी ही सभा नाही.अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटाकडून म्हणणे सादर करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांनी आधीच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईचे पत्र दिले आहे. या संदर्भात पुढील प्रक्रिया सुरु आहे. तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सामील होताना शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असं होत नाही. आम्ही आमचा विचार बदलला नाही. आमच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी आमच्यासोबत सामील होण्याबाबत आजही अपेक्षा आहे. साहेबांना त्रास होऊ नये म्हणून बॅनरवर फोटो लावलेले नाहीत. ईडीला घाबरुन आम्ही गेलो हा शरद पवार यांचा आरोप चुकीचा आहे.

COMMENTS