Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खातेवाटपांसह मंत्रिमंडळ विस्तार रखडला

आज खातेवाटप होण्याची शक्यता ; शिवसेनेतील आमदारांमध्ये नाराजी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील भाजप शिंदे गटाच्या सरकारमध्ये अजित पवारांचा गट सहभागी होवून, मंत्रिपदाची शपथ घेवून तब्बल 12-13 दिवसांचा कालावधी उलटला

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शेळीपालन व्यवसाय शिबीर  
आज १४ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील भाजप शिंदे गटाच्या सरकारमध्ये अजित पवारांचा गट सहभागी होवून, मंत्रिपदाची शपथ घेवून तब्बल 12-13 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार होते, मात्र शिवसेनेच्या आमदारामध्ये नाराजी असल्यामुळे मंत्रिमंडळासह खातेवाटप रखडतांना दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये रात्रीच्या अनेक बैठका होवूनही यावर तोडगा निघालेला नाही. अजित पवार गट महसूलमंत्री आणि अर्थमंत्री या पदावर अडून आहेत. भाजप देखील ही पदे देण्यास अनुकूल असली तरी शिंदे गट मात्र याला विरोध करतांना दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ या नेत्यांनी दिल्ली गाठत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत, त्यांनाच यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे अखेर अमित शहा याप्रकरणी शिंदे गटाची समजूत काढणार आहे, मात्र अगोदर मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतरच खातेवाटप असा पवित्रा शिंदे गटाने घेतल्यामुळे राज्यातील खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे दिसून येत आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आज शुक्रवारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार असून, सकाळी 11 वाजता शपथविधी पार पडणार असून, त्यानंतर खातेवाटप होणार असल्याचे समजते.
दरम्यान, येत्या 17 जुलै पासून विधी मंडळाचं तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप होणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यासाठी वरिष्ठ स्तरावर गेल्या चार ते पाच दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग तीन दिवस रात्री उशिरा बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास विरोध होता. त्यामुळे हा तिढा निर्माण झालेला होता. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी पार पडणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना मुंबईमध्ये थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकमत होतांना दिसून येत नाही. आज शुक्रवारी जर मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर, हा विस्तार अधिवेशनानंतरच होणार आहे. जर आताच विस्तार केला तर, अधिवेशनामध्ये आमदारांची नाराजी ओढवून घ्यावी लागू शकते, म्हणून हा विस्तार पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अर्थसह महसूल मंत्रीपदासाठी पवार गट आग्रही- उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत आलेले आमदार यांच्या सात-सात टर्म आमदार राहिलेले आहेत. शिवाय मंत्रिमंडळात त्यांनी अतिशय महत्वाचे मंत्रिपद भूषवले आहेत. त्यामुळे त्यांना चांगली खाते देण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे अर्थमंत्री, महसूल, सार्वजनिक बांधकाम या खात्यांसाठी अजित पवार आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मात्र जर आज शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर, खातेवाटप होईल असे समजते.

COMMENTS