लखनौ ः योगी मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. ओमप्रकाश राजभर, भाजप नेते दारा सिंह चौहान आणि आरएलडीच्या आमदारांना मंत्रिमंडळ

लखनौ ः योगी मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. ओमप्रकाश राजभर, भाजप नेते दारा सिंह चौहान आणि आरएलडीच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी राजभवनात पोहोचले. येथे मंत्रिमंडळ विस्तारावर राज्यपालांशी 20 मिनिटे चर्चा झाली. मंत्र्यांची यादीही राज्यपालांना सुपूर्द करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार योगी मंत्रिमंडळात 5 चेहर्यांना स्थान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने हा मोठा मास्टर प्लॅन बनवला आहे.
COMMENTS