Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामाच्या तणावातून सीए तरूणीची आत्महत्या

पुणे ः आजच्या प्रगत युगात कामाचा ताण-तणाव सातत्याने येत असल्याचे दिसून येत आहे. याच तणावातून एका 26 वर्षीय सीए तरूणीने आत्महत्या केल्याची घटना पु

हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
उच्चशिक्षित बहीण-भावाची आत्महत्या

पुणे ः आजच्या प्रगत युगात कामाचा ताण-तणाव सातत्याने येत असल्याचे दिसून येत आहे. याच तणावातून एका 26 वर्षीय सीए तरूणीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात नुकतीच उघडकीस आली आहे. तरूणीच्या आईन आपल्या मुलीच्या बॉसवर कामाचा अत्याधिक दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. अ‍ॅना सेबॅस्टियन पिरायिल नामक तरुणी मार्च 2024 मध्ये ईवाय पुणे येथे नोकरीस लागली होती. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच म्हणजे जुलैमध्ये तिने आत्महत्या केली. आईने आता कंपनीच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मृत तरुणीची आई अनिता ऑगस्टीन आपल्या पत्रात म्हणतात, मी हे पत्र एक दुःखी आई म्हणून लिहीत आहे, जिने स्वतःचे एक अनमोल मूल गमावले आहे. अ‍ॅना नोव्हेंबर 2023 मध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती 19 मार्च 2024 रोजी पुण्यातील ईवाय कंपनीत कार्यकारी म्हणून रुजू झाली. पण 4 महिन्यांतच 20 जुलै रोजी तिच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर आदळली. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अ‍ॅनाचे निधन झाले होते. ती केवळ 26 वर्षांची होती. कंपनीत नोकरीस लागल्यानंतर लगेचच तणाव, नवे वातावरण व प्रदीर्घ काळापर्यंत काम केल्यामुळे ती चिंता व तणावाच्या गर्तेत सापडली होती. पण त्या स्थितीतही ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. अ‍ॅना रुजू झाली तेव्हा कंपनीच्या अनेक कर्मचार्‍यांनी राजीनामा दिला होता. टीम मॅनेजरने तिला म्हटले, अ‍ॅना तुम्हाला आपल्या टीमविषयीच्या सर्वांच्या भावना बदलाव्या लागतील. ते असे का म्हणाले हे माझ्या मुलीला समजले नाही. पण त्याची किंमत तिला स्वतःचे जीवन देऊन चुकवावी लागली. एका तरुण चार्टर्ड अकाउंटंटने कामाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करणे व तिच्या अंत्यसंस्काराला कंपनीचा एकही व्यक्ती उपस्थित न राहणे ही अत्यंत भयावह व वाईट गोष्ट आहे, असे अनिता यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. अनिता आपल्या पत्रात पुढे म्हणतात, तिच्याकडे खूप काम होते. पण आराम करण्यासाठी सहसा फारच कमी वेळ असायचा. तिचे व्यवस्थापक अनेकदा क्रिकेट सामन्यांमधील मीटिंग्ज पुन्हा शेड्यूल करायचे आणि दिवसाच्या अखेर तिच्या अंगावर कामाचे ओझे टाकून जायचे. यामुळे ती तणावात गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत काम करत होती. आठवड्याच्या शेवटीही तिला श्‍वास घेण्याची फुरसत नव्हती. एकदा तिच्या सहाय्यक व्यवस्थापने तिला एक काम करण्यासाठी बोलावले. दुसर्‍या दिवशी ती विनाआराम ऑफीसला गेली. माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीचा कोणताही व्यक्ती आला नव्हता. तिथे एक तरी मिनिट आहे का? असा सवाल अनिता यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे. आता केंद्रीय कामगार मंत्रालयाने अनिता ऑगस्टीन यांची तक्रार स्वीकारल्याचे म्हटले आहे. आता अ‍ॅनाच्या मृत्यूची चौकशी केली जाईल. कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर सांगितले, ’अ‍ॅनाच्या निधनाने दु:ख झाले. असुरक्षित आणि तणावपूर्ण वातावरणाच्या आरोपांची कसून चौकशी केली जात आहे. न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

COMMENTS