Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार वारिशे यांचा अपघात ठरवूनच

राज्य सरकारची विधिमंडळात माहिती

मुंबई/प्रतिनिधी ः कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात वार्तांकन करताना स्थानिक ग्रामस्थ व आंदोलकांची बाजू मांडणारे पत्रकार शशिकांत वारिसे यां

देश सुरक्षा आणि हनी ट्रॅप
तीन दुचाकीसह चार चोरांना पोलिसांनी केले जेरबंद
‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसची पॅरोलवर सुटका

मुंबई/प्रतिनिधी ः कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात वार्तांकन करताना स्थानिक ग्रामस्थ व आंदोलकांची बाजू मांडणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मागील महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. हा अपघात नसून खूनच असल्याचा आरोप रिफायनरी विरोधक संघटनांनी केला होता. राज्य सरकारनेही आता एक प्रकारे त्यास दुजोरा दिला आहे. शशिकांत वारिसे यांचा अपघात ठरवून घडवून आणण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती असल्याचे राज्य सरकारने एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.
विधान परिषदेत विरोधकांनी या संदर्भात उपस्थित केला होता. त्यावर सरकारने उत्तर दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येईल, असे उत्तरात म्हटले आहे. शशिकांत वारिशे हे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील एका वर्तमानपत्रात वार्ताहर होते. कोकणातील बारसू इथ प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या दैनंदिन बातम्या ते करायचे. नाणार असो की बारसू येथील रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता. या विरोधाच्या बातम्याही ते आपल्या वर्तमानपत्रात देत असत. त्यांनी काही दिवसांपूर्वी याच प्रकल्पाच्या संदर्भात लेख लिहिला होता व त्यात प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या आंबेरकर याचा फोटोही होता. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला हा आंबेरकर स्थानिकांना धमक्या देत असल्याचे वारिशे यांनी लिहिले होते. या लेखानंतर काही दिवसांतच वारिशे यांचा अपघात घडवून आणण्यात आला होता. राजापूर येथील एका पेट्रोल पंपावर थार गाडीने वारिशे यांच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली असून सध्या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे.

COMMENTS