Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थायलंडला नमवून व्हिएतनामने विश्‍वचषक प्रवेशाच्या आशा कायम राखल्या

नवी मुंबई / प्रतिनिधी : एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने थायलंडचे कडवे आव्हान 2-0 गोलन

कोहलीचा नवा मोठा विक्रम
भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या
बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं पदक निश्चित.

नवी मुंबई / प्रतिनिधी : एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने थायलंडचे कडवे आव्हान 2-0 गोलने परतावले. या शानदार विजयासह व्हिएतनामने सन 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होणार्‍या फिफा विश्‍वचषक स्पधेर्ची पात्रता मिळवण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. व्हिएतनामला पात्रता मिळवण्यात यश आले, तर विश्‍वचषक स्पर्धेत पहिल्यांदा त्यांचा सहभाग होईल.
डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात व्हिएतनामने नियोजनबध्द खेळ करत बाजी मारली. रविवारी होणार्‍या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने चायनिज तैपईला नमवले तसेच फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील दक्षिण आशियाई देशांचे स्थान स्पष्ट होईल. याआधीच चायना पीआर, जपान, कोरिया रिपब्लिक, फिलिपाईन्स आणि सह-यजमान ऑस्ट्रेलिया यांनी विश्‍वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्‍चित केले आहे. त्याचवेळी, थायलंडला विश्‍वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या आशा कायम राखण्यासाठी शुक्रवारी होणार्‍या सामन्यात चायनिज तैपईविरुध्द विजय मिळवणे अनिवार्य असेल. जर थायलंड पराभूत झाले, तर त्यांना इंटर-कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीत खेळावे लागेल.
थायलंड आणि व्हिएतनाम यांना रविवारी झालेल्या आपापल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्ले ऑफ लढतीतून चमकदार कामगिरी करत दोन्ही संघांना सकारात्मकरीत्या घरी परतण्याची संधी होती. यामध्ये सध्या व्हिएतनाम संघ वरचढ ठरला. व्हिएतनामने सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन गोल करत एकहाती वर्चस्व राखले. थायलंड संघ अजूनही कोरोना संक्रमणातून सावरला नसल्याचे त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून आला.
व्हिएतनामनेही आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आपले नियंत्रण राखले. कर्णधार ह्युन न्हू हिने 19 व्या मिनिटालाच पहिला गोल करत व्हिएतनामला आघाडीवर नेले. गोलजाळ्याच्या बरोबर समोर येऊन तिने गोल करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली. पाचच मिनिटांनी व्हिएतनामने आपली आघाडी दुप्पट केली. एनग्युयेन थी तुयेट डंगने दिलेल्या क्रॉस पासवर थाइ थी थाओने अप्रतिम गोल केला. व्हिएतनामचा हा धडाका पाहून थायलंडची लय बिघडली. मध्यंतराला 2-0 गोल अशी आघाडी कायम राखलेल्या व्हिएतनामने दुसजया सत्राच्या तीन मिनिटांनी आपला तिसरा गोल जवळपास केला होता. पण थायलंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या फाम हाइ येनला गोल करता आला नाही. तसेच दोन मिनिटांनी ह्यून न्हूने चेंडू गोलजाळ्यात ढकललाह, मात्र ’वार’ नियमामुळे न्ह्यूने केलेली आगेकूच ऑफ साइड ठरल्याने हा गोल यशस्वी ठरला नाही.
सामन्याच्या अखेरच्या क्षणामध्ये रेड कार्डचे नाट्यही रंगले. थायलंडच्या गोलक्षेत्रात जबरदस्त आक्रमण केलेल्या एनग्युयेन थी थान नाह हिला गोल करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती. मात्र, थायलंडच्या कांचनापोर्न साएनखुनने तिला खाली पाडल्याने तिला रेड कार्डला सामोरे जावे लागले. यावेर मिळालेल्या फ्री किकवर व्हिएतनामचा गोल चुकला. परंतू त्याचा सामन्याच्या निर्णयावर काहीच फरक पडला नाही. आता रविवारच्या लढतीत व्हिएतनाम चायनिज तैपईच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल.

COMMENTS