पुणतांबा ः कोपरगाव आगाराच्या बस चालक व वाहकाला पुणतांबातील विद्यार्थ्याने मारहाण केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कोपरगाव श्रीरामपूर आगाराने पुणत
पुणतांबा ः कोपरगाव आगाराच्या बस चालक व वाहकाला पुणतांबातील विद्यार्थ्याने मारहाण केल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कोपरगाव श्रीरामपूर आगाराने पुणतांबा मार्गे बस वाहतूक बंद ठेवली. त्याचा फटका विद्यार्थी व प्रवासी वर्गाला बसला मारहाण करणार्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा एस टी महामंडळाने केली आहे.
सोमवारी कोपरगाव आगाराचे सहाय्यक आगारप्रमुख दिघे व एसटी कर्मचार्यांनी पुणतांबा येथे भेट देऊन झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. सोमवारपासून बस वाहतूक सुरू होत आहे, मात्र ग्रामस्थांनी देखील याची दक्षता घ्यावी चालक वाहकाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा एस टी महामंडळाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली, त्यावर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी एसटी बसेस सुरू करा पुन्हा असा प्रकार होणार नाही याबाबत काळजी घेऊ आश्वासन दिले. गेल्या तीन दिवसांपूर्वी कोपरगाव आगाराच्या चालक व वाहकाला पुणतांबातील विद्यार्थ्याने मारहाण केली होती त्यामुळे कोपरगाव आगाराने याचा निषेध म्हणून पुणतांबा मार्गे बस वाहतूक बंद ठेवली. श्रीरामपूर आगारांनी देखील याचा निषेध करून आपल्या डेपोच्या बस बंद ठेवल्या बस बंद झाल्यामुळे कोपरगाव श्रीरामपूर जाणार्या प्रवासी वर्गाची हाल झाले. विद्यार्थ्यांचे परीक्षा असल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भर चौकात चालक वाहकाला मारहाण झाल्यामुळे, एसटी मंडळाचे कर्मचारी संतापले होते. भर चौकात मारहाण झाली, मात्र अनेकांनी बघायची भूमिका घेतली त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत कोपरगाव चालक वाहक यांनी राहता पोलीस स्टेशन मध्ये अनिकेत संजय जोगदंड यांच्याविरुद्ध तक्रार केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली असली तरी पोलिसांनी अद्याप अटक केली नसल्यामुळे पोलिसांबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
COMMENTS