संगमनेर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव जवळील एकोणवीस मैल फाट्यावर बस आणि मोटर साय
संगमनेर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव जवळील एकोणवीस मैल फाट्यावर बस आणि मोटर सायकलचा अपघात घडला आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
पठार भागातील एकोनाविस मैल फाट्यावर नवापूरहुन संगमनेर मार्गे पुण्याला जाणारी भरधाव बस क्रमांक एम एच १४ बी टी २२१३ या बसने जुन्नर तालुक्यातील सुनील खंडू बटवाल व नंदाभाऊ नानाभाऊ कापरे हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच १४ एन ३१९८ वर स्वार होत एकोनावीस मैल फाट्याजवळून रस्ता क्रॉस करत होते. अतिथी मंगल कार्यालयात विवाह समारंभास जाताना बस आणि मोटरसायकलचा हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसने मोटरसायकला पाठीमागून धडक दिल्याने यात मोटरसायकल स्वार नंदाभाऊ नानाभाऊ कापरे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सुनील खंडू बटवाल किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीला खाजगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
दरम्यान, पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचे उल्लंघन तसेच भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे.
COMMENTS