Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास

म्हसवड : म्हसवड शहरात मध्यरात्री 2 ते अडीचच्या दरम्यान येथील सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठेसह खंडोबा मंदिर परिसरातील 10 पेक्षा अधिक घरां

सातारा जिल्ह्यातील खाण पट्ट्याचे आज लिलाव; वडार समाजात धुसपुस
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या : श्रीकांत देशपांडे
शिवंम प्रतिष्ठानतर्फे डॉ. सुरेश भोसले यांचा कोव्हीड योध्दा आरोग्य पुरस्काराने सन्मान

म्हसवड : म्हसवड शहरात मध्यरात्री 2 ते अडीचच्या दरम्यान येथील सनगर गल्ली, गुरव गल्ली, मुख्य बाजारपेठेसह खंडोबा मंदिर परिसरातील 10 पेक्षा अधिक घरांचे कुलूपे कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा मुद्देमालाची चोरी करत चोरट्यांनी शहरात दहशत उडवून दिली. तर या चोरट्यांच्या टोळक्याने चोरी करताना दहशत माजवण्यासाठी हातात नंग्या तलवारी घेऊन फिरत असल्याचे शहरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.
शहरात 10 ते 12 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप 2 जणांनीच याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून, पोलीसांनी फिर्यादीवरुन घडल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून याठिकाणी श्‍वान पथकास पाचारण करुन तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत.
पालिकेच्या एका नगरसेवकाच्या घरातून मोठी रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. तर अन्य एकाच्या घरात दागिण्यावर डल्ला मारला आहे. येथील खंडोबा मंदिर लगत राहत असलेले सूर्यकांत कथले यांच्याही घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून त्यांच्या बहिणीचा मोबाईल व रोख 2 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहेत.
दरम्यान, येथील गुरव गल्ली येथे मध्यरात्री चोरट्यांनी काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न करताना येथील एकाला जाग आल्याने त्याने आरडाओरडा करत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तेथून पळ काढताना संबधित व्यक्तीच्या दिशेने जोरदार दगडांचा वर्षाव करत दहशत निर्माण केली. यामुळे भयभीत झालेल्या त्या तरुणाने चोरट्यांचा पाटलाग थांबवला. या सर्व ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी करीत दहशत निर्माण करताना नंग्या तलवारी नाचवल्या असल्याचे शहरातील एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाले असून, पोलिसांनी फिर्याद दाखल होताच सीसीटीव्हीचे चित्रिकरण ताब्यात घेतले असून, चोरीचा छडा लावण्यासाठी शहरात श्‍वानपथकास व ठसेतज्ञांना पोलीसांनी पाचारण केले असून, तपास बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सुरु केला.
दरम्यान, म्हसवड शहरात एकाच रात्रीत 10 हून अधिक ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने म्हसवडकरांत कमालीची भिती पसरली असून, पोलीसांनी त्वरीत चोरट्यांचा बंदोबस्त करीत शहर व परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी म्हसवडकर जनतेतून होत आहे.

COMMENTS