Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांदळा येथिल गवते यांच्या घरी पुन्हा घरफोडी

मादळमोही प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तांदळा येथिल ज्ञानेश्वर अंकुश गवते ऊर्फ राजेंद्र यांच्या घरी रात्री 1 वाजता घराच्या गेटचे कुलूप तोडून घर

आण्णाभाऊ साठेंचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
आईसह दोन मुलांची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या
टाकळीमियातील बाल संस्कार शिबिराला उत्साहात सुरूवात

मादळमोही प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तांदळा येथिल ज्ञानेश्वर अंकुश गवते ऊर्फ राजेंद्र यांच्या घरी रात्री 1 वाजता घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला यावेळी घरात राजेंद्र सह आई व पत्नी घरात झोपलेले होते, दरोडेखोरांनी राजेंद्रच्या गळ्याला चाकू लावून गप्प बसवले व घरातील कपाटाची झडती घेतली परंतु कपाटात काही मिळाले नाही शेवटी राजेंद्रच्या आईच्या गळ्यातील पोत व पत्नीच्या गळ्यातील पोत चोरट्यांनी हिसकावून घेऊन एकूण एक लाख चाळीस हजार रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाले. चकलंबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गु.र.न. 0225/ 2023 भादविस 457,380 नुसार फिर्याद दाखल झाली आहे.

कल्याण-विशाखापटनम् राष्ट्रीय महामार्गालगत तांदळा येथे दि. 4 ऑगस्ट शुक्रवार रोजी राजेंद्र अंकुश गवते आपल्या राहत्या घरी झोपलेले असताना रात्री 1 वा. सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी आई सागरबाई यांना कसलातरी आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या व समोर अज्ञात चोरट्यांनी पाहून मुलाला आवाज दिला राजेंद्र यांना आईचा आवाज येताच ते जागे झाले त्याक्षणी चोरट्यांनी राजेंद्रच्या गळ्याला चाकू लावला आरडाओरडा केला तर जीव मरण्याची धमकी दिली. दरम्यान, घरातील दोन कपाटाची झडती घेतली परंतु कपाटात काही मिळाले नाही शेवटी राजेंद्रने चोरट्यांनी सांगितले कि मागील वर्षी आमच्या घर फुटले होते त्यावेळी सर्व सोने व पैसे चोर घेऊन गेले होते आता माझ्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. यावर चोरट्यांनी आईच्या गळ्यातील पोत व पत्नीच्या गळ्यातील पोत चोरट्यांनी हिसकावून घेतली व रोक रक्कम घेऊन पसार झाले.  विशेष म्हणजे तांदळा येथील राजेंद्र गवते यांच्या घरी दि. 17 जानेवारी 2022 रोजी दिवसाढवळ्या आज्ञात दरोडेखोरांनी दुपारी 3 वाजता घराचा कुलपासह कोंडा तोडून घरातील पंधरा सोने सह अडोतीस हजार रुपायावर दरोडेखोरांनी हात साफ केला. वारंवार येथे चोरी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून चंकलंबा पोलिंसाना दरोडेखोराने तगडे आवहान दिले आहे. घटनास्थळी फिंगार प्रिंट एक्सप्रट व श्वान पथक पाचरण केले आहे घटनास्थळी चकलंबा सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे दाखल झाले असून चकलंबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गु.र.न. 0225/ 2023 भादविस 457,380 नुसार फिर्याद दाखल झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोह. मिसाळ, करत आहेत.  विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर 222 वर चकलंबा पोलिसांची गाडी पेट्रोलिंग साठी उपलब्ध आहे, घटनास्थळापासून गाडी अर्ध्या तासापूर्वी राऊंड मारून गेली होती आणि तांदळा येथे परत पेट्रोलिंगची गाडी  रात्री 2 सुमारास आली तोपर्यंत दरोडेखोर डाव साधून पसार झाले. याच महामार्गावर पुढे मादळमोही येथे चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे. चोरटेच पोलिसांवरच करडी नजर ठेऊन असल्यामुळे हात साफ करून चोरटे पोलिसांना चूना लावून धूम ठेकत आहेत.

COMMENTS