Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा

मुख्याधिकारी यांनी एकदातरी शहरात फिरून पहावेच..

जामखेड ः जामखेड शहराला कोणत्याही मूलभूत प्रामाणिकपणे नगरपरिषदकडून सुविधा मिळत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. वीज, पाणी, रस्ते, नालेसफाई, कचरा

सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर
Sangamner : पठारावरील वाळूतस्करी काही केल्या थांबेना
समता परिवारातील सर्व महिलांचा हा सन्मान ः स्वाती संदीप कोयटे

जामखेड ः जामखेड शहराला कोणत्याही मूलभूत प्रामाणिकपणे नगरपरिषदकडून सुविधा मिळत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. वीज, पाणी, रस्ते, नालेसफाई, कचरा विल्हेवाट, सांडपाणी विल्हेवाट, कशा प्रकारे होत आहे हे एकदा तरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष शहरात फिरून पहावे अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदला प्रशासकीय राज आहे. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांच्याकडे जवाबदारी आहे. सह्या करण्यापलीकडे कोणत्याही बाबींकडे प्रशासक यांचे लक्ष नाही. मुख्याधिकारी यांना विचारणारे कोणी नाही. दोन ठिकाणचा चार्ज आहे या सबबीखाली कधीही या अन् जा, सगळा हम करे सो कायदा याप्रमाणे मुख्याधिकारी यांचे बेलगाम कामकाज चालू आहे. यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासुन ते कार्यालयीन कामकाजाचाही त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या-तक्रारी ऐकण्यासाठी मुख्याधिकारी उपलब्ध नसतात. कर्मचारी सांगतात मुख्याधिकार्‍यांना सांगितल्याशिवाय काही करता येत नाही. सध्या पावसामुळे शहरांतर्गत रस्ते, साचलेले तळेवजा डबके, नाल्या, त्यावरून वहाणारे पाणी दुर्गंधीयूक्त रस्त्यावर वाहणारे पाणी, नागरिकांना चालावे की उड्या माराव्या अशी अवस्था शहरातील काही भागात झाली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासुन होत असलेल्या पावसामुळे शहरातील पोकळे वस्ती, नूरानी बेकरी परिसर, मिलिंदनगर, मार्केट यार्डच्या पाठीमागील परिसर, संताजी नगर, मोरेवस्ती, सदाफुले वस्ती, पाणी टाकी परिसर आदी भागात नागरिकांना जाण्या येण्याची दयनीय अवस्था झाली आहे. पोकळे वस्ती, नुरानी बेकरीसह अनेक ठिकाणी दोन्ही बाजूला घरे आणि मध्येच मोकळे भुखंड आहेत. त्यात पावसाच्या पाण्याने तळे तयार होऊन असून घराच्या दारात  पाणीच पाणी साचते. नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील होते. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे. अशा मोकळ्या जागेमुळे नागरिकांना होणार्या त्रासाची जागा मालक व नगरपरिषद यांना काही घेणे देणे दिसत नाही. शहराला उजनी पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनची ऐन पावसाळ्यात खोदकाम सुरू केले आहे. संबंधित ठेकेदार व आधिकारयांच्या आडमुठेपणामुळे शहरात अनेक भागात या खोदकामामुळे जाण्यायेण्याचा रस्ते खराब झाले आहेत त्यातच पावसाचे पाणी. मुख्याधिकारी यांनी एकदातरी शहराची अवस्था पहावी शहरात फीरून प्रत्यक्ष पहावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS