Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहूर शहारात कर्णकर्कश आवाजाचे फटाके फोडत बुलेट सुसाट! पोलिसांचे दुर्लक्ष

माहूर । प्रतिनिधी माहूर शहरात श्री रेणूका कॉलेज पासुन ते बस स्टॅण्ड पर्यंत तसेच शहरात अनेक गल्ली बोळात फट्फट् आवाज करत बुलेट सुसाट धावत आहेत. या बुलेट

माहूर तालुक्यातील नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडाव्यात -आ.केराम
माहूरच्या रेणुका मातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीची श्री बालांबिका देवी (Video)
केसुला बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

माहूर । प्रतिनिधी
माहूर शहरात श्री रेणूका कॉलेज पासुन ते बस स्टॅण्ड पर्यंत तसेच शहरात अनेक गल्ली बोळात फट्फट् आवाज करत बुलेट सुसाट धावत आहेत. या बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम आबालवृद्धांवर होत असुन नागरीक त्रस्त आहेत.मात्र, दुचाकीवर राजरोसपणे कारवाई करणार्‍या पोलिसांचा हात बुलटेधारकांसमोर आडवा होत नसल्याचे वास्तव असून सर्रास धावणार्‍या या बुलेटवर कारवाई करण्यास पोलिस का घाबरतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात धावत असलेल्या बुलेटमुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. कर्णकर्कश आवाजामुळे आबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा आवाज करणार्‍या बुलेटवर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. रुबाबदार वाहन म्हणून बुलेटकडे बघितल्या जात असल्यामुळे गत काही वर्षांपासून शहरात बुलेटचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचे लक्ष आपणाकडे वेधून घेण्यासाठी बुलेट चालकांनी सायलेन्सरमध्ये विनापरवाना तांत्रिक बदल केलेले दिसत आहे. फायरिंगचा कर्कश आवाज निर्माण करून फटाके फोडण्यासारखा आवाज बुलेटमधून येत आहे. अशा कर्णकर्कश आवाजाचा दुष्परिणाम लहान मुले, गर्भवती महिला वृद्धांना होत आहे. पोलिस प्रशासनाचे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिार्‍यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS