Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले

मुंबई ः ठाण्यात छताला आणि खांबांना तडे गेल्याने 5 इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 250 कुटुंबे राहत होते. ठाणे महापालिकेच्या एका

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
विचारांशी असहमत असणाऱ्यांशी सहमती जतवा !

मुंबई ः ठाण्यात छताला आणि खांबांना तडे गेल्याने 5 इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 250 कुटुंबे राहत होते. ठाणे महापालिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, काही इमारतींचे छत कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबांना धोकादायक इमारतींमधून बाहेर काढले जात आहे.
अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना तडे गेले. यानंतर अग्निशमन विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी इमारतींची पाहणी केली. इमारतींना अचानक तडे का गेले, हे अद्याप कळू शकलेले नाही. अधिकार्‍यांनी सांगितले की, तडे गेलेली एक इमारत 1998 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीचा धोकादायक इमारतींच्या यादीत तिचा समावेश नव्हता. या इमारतींची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील. दरम्यान, या इमारतींमधून बाहेर काढण्यात आलेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून निवार्‍याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. नवीन निवार्‍यासाठी कुटुंबीयांनाच शोधाशोध करावी लागत आहे. अद्यापतरी जीर्ण इमारतींमुळे कोणालाही दुखापत झालेली नाही.

COMMENTS