Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमा व प्रशांत चित्ते यांच्या गायनाने  5 मे रोजी होणार बुद्धप्रभात.

नांदेड प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे सकाळी सहा वाजता बुद्ध प्रभात या कार्यक्रमाचे आय

रेणापूर बाजार समिती लातूरप्रमाणे विकसित करणार
सलमान खान च्या फॅन्सनी सिनेमागृहात फटाके फोडत ‘टायगर 3’चे केले स्वागत
अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 

नांदेड प्रतिनिधी – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे सकाळी सहा वाजता बुद्ध प्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमास बौद्ध अनुयायांनी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
मागील पंधरा वर्षापासून एकनिष्ठ प्रतिष्ठान तर्फे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीदिनी बुद्धप्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .या कार्यक्रमास मयूर मधुर शिंदे ,अजय देहाडे, कुणाल वराळे, प्रेमानंद जाधव, प्रा.  गणेश चंदनशिवे , नागसेन सावदेकर, अंकुश चित्ते,मंजुषा शिंदे,  यांनी हजेरी लावली आहे यावर्षी 5 मे 2023 शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता प.पू. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर पुतळा परिसर रेल्वे स्टेशन जवळ नांदेड येथे मिस सीमा व प्रशांत चित्ते हे तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीते सादर करतील यांच्यासोबत पत्रकार विजय निलंगेकर महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अंकुश चित्ते हे पण गीते सादर करतील. या कार्यक्रमास स्वागतअध्यक्ष म्हणून युवानेते  संजय वाघमारे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजसेवक किशोर भवरे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश गोडबोले ,सुरेश हटकर, डॉ. दिनेश निखाते, डॉ. आनंत सूर्यवंशी, दशरथ पाटील, अशोक भोरगे , इंजि. उमाकांत कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या उपस्थित राहणार आहेत .तरी या कार्यक्रमास दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीचे अध्यक्ष संपादक श्याम कांबळे, मुख्य संयोजक निहाल निलंगेकर, पत्रकार कुवरचंद मंडले, सुनील कांबळे, दीपंकर बावस्कर , गंगाधर झिंजाडे, यशवंत थोरात, अनिरुद्ध निखाते, बुद्धभूषण रायबोले, कुणाल सूर्यतल, रोहन गायकवाड, स्वप्नील राऊत, सुशील हटकर, यांनी केले आहे.

COMMENTS