Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  

राहुरी तालुक्यातील नांदूरच्या मुळा धरण पायथ्याशी आढळला मृतदेह

देवळाली प्रवरा ः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डाव्या कालव्यालगत एका 30 ते 35 वर्ष वय अस

महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
पुणतांबा शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा : कृषीमंत्री दादा भुसे
काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्याला बक्षीस : सागर केदार

देवळाली प्रवरा ः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डाव्या कालव्यालगत एका 30 ते 35 वर्ष वय असलेल्या तरुणाचा निर्घृण खून करीत त्यास पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये आणून टाकल्याची घटना उघडकीस आली. पोलिस प्रशासनाने तत्काळ दखल घेत घटनेची चौकशी सुरू केली असून घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथक आणत घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न झाला. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने घटनेचे मारेकरी शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

           राहुरी परिसरामध्ये खून प्रकरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डाव्या कालव्यालगत एका तरुणाला पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये घुसविण्याचा प्रयत्न करीत बांधून टाकल्याची घटना उघडकीस आले. सकाळी शेताकडे जात असताना सुलतान पटेल यांना उग्रवास आला. त्यांना पाहणी केली असता तरुणाला एका 100 लिटरच्या पाण्यच्या टाकीत टाकून बांधलेल्या अवस्थेत फेकल्याचे दिसले. त्यांनी  माहिती जि.प.सदस्य धनराज गाडे व ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना माहिती देताच अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक  वैभव कुलुबर्मे, यांसह श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक बसवराज शिवपुंजे,  पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान फडोळ, पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे, चारुदत्त खोंडे, पोलिस हवालदार भगवान थोरात, सागर नवले, औटी, खेमनर, साखरे, सय्यद यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. नगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथून ठसे तज्ञ व श्‍वान पथक आले होते. श्‍वान जागेवरच घुटमळला त्यामुळे आरोपींचा मार्ग समजू शकला नाही. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या डोक्यात मोठी मारहाण केली असल्याने डोळे बाहेर पडल्याने तरुणांची ओळख मिळविणे पोलिसांपुढे आव्हानात्मक आहे. निळ्या प्लास्टीक छोट्या पिंपामध्ये टाकून दिलेल्या तरुणाच्या अंगामध्ये निळी जिन्स पॅन्ट, उंची साडे पाच फूट, पायात कॅम्पस कंपनीचा शूज, अ‍ॅक्टीव्ह  सेल्स तळव्यावर लिहीलेले, उजव्या हाताला काळा धागा बांधलेला तर उजव्या हातावर महादेवाचा फोटोसह महादेव असे नाव गोंदलेले, तर डाव्या हातावर इंग्रजीत डियर असे लिहीत महादेव असे लिहीलेले अवस्थेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. राहुरी पोलिस प्रशासनापुढे अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख मिळवणे, मारेकर्‍यांचा शोध घेण्याबाबत तपासाला गती द्यावी लागणार आहे. नेमका तरुण कोण? इतका निर्घून खून कोणी केला व कशासाठी केला? याबाबत उलट सुलट चर्चा होत आहेत.

COMMENTS