Homeताज्या बातम्यादेश

बीआरएस च्या आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू

सुलतानपूर - सिकंदराबाद कँटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होते. संगारेड्डीत

Beed : सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबणार का ? | LOKNews24
अंत्ययात्रेत वाजला डीजे, खांदेकरीही नाचले. धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
वाहतुकीच्या दिशेने शाश्वत पर्यायी योजनेअंतर्गत एक उपक्रम 

सुलतानपूर – सिकंदराबाद कँटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होते. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल भागात सुलतानपूर आऊटर रिंग रोडवर त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर आदळली. या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही नंदिताच्या निधनावर शोक व्यक्त केला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्विट केले की, ‘कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

COMMENTS