Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’एमआयटी एडीटी’च्या प्रांजली सुरदुसेला कांस्यपदक

आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

चांगाई (थायलंड) : येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच

खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद – नीरज चोप्रा
आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

चांगाई (थायलंड) : येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने सांघिक गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
या स्पर्धेत भारताच्या मुले व मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. मुलींच्या संघात प्रांजलीसह रिचा सिंग, ईशा फुलबांदे, इशिका हनवंत या खेळाडूंचा समावेश होता. प्रांजलीने नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धे त सुवर्णपदक, तर 37 व्या राष्ट्रीय मिनी गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकदेखील पटकाविले होते. प्रांजलीच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, स्कूल ऑफ बायो इंजिनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. रेणू व्यास, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS