Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीतील साहित्य गायब : शेलार  

श्रीगोंदा   : श्रीगोंदा शहरातील पोलिस स्टेशनच्या पश्चिम बाजूस असलेल्या ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीतील इमारतीमधून कोणतीही शासकीय परवानगी न घेता साहित्य काढून नेऊन ते गायब केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष घनशाम प्रतापराव शेलार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, सदर इमारत शासकीय असूनही तिची तोडफोड करून बांधकाम साहित्य गायब करण्यात आल्याचे नमूद केले आहे. शासनाच्या मालमत्तेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता विल्हेवाट लावणे हा गंभीर गुन्हा असून, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शासनाच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तत्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. तसेच ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नम्र विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य आजही प्रेरणादायी : पोटे
श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात 

श्रीगोंदा   : श्रीगोंदा शहरातील पोलिस स्टेशनच्या पश्चिम बाजूस असलेल्या ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीतील इमारतीमधून कोणतीही शासकीय परवानगी न घेता साहित्य काढून नेऊन ते गायब केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष घनशाम प्रतापराव शेलार यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून, सदर इमारत शासकीय असूनही तिची तोडफोड करून बांधकाम साहित्य गायब करण्यात आल्याचे नमूद केले आहे. शासनाच्या मालमत्तेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता विल्हेवाट लावणे हा गंभीर गुन्हा असून, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे शासनाच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तत्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांची उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. तसेच ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नम्र विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS