Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्रिटनचे माणूस केंद्रीत धोरण ! 

चीनमध्ये कोरोना अजूनही सुरू आहे. जगातील इतर देशांमध्ये कोरोनाचा कहर पूर्णपणे नियंत्रणात आला असला, तरीही, जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही अधिकृतपणे

सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
सुदृढ लोकशाहीसाठी निष्पक्ष आयोग !
महाराष्ट्राला वेठीस धरणे अयोग्यच ! 

चीनमध्ये कोरोना अजूनही सुरू आहे. जगातील इतर देशांमध्ये कोरोनाचा कहर पूर्णपणे नियंत्रणात आला असला, तरीही, जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही अधिकृतपणे कोरोना गेला, असे डिक्लेअर केलेले नाही. याचा दुसरा अर्थ कोरोनाचा आजार, हा जगामध्ये यापुढेही असणार, परंतु त्याची भीषणता ही सर्दी-पडशासारखी किरकोळ होऊन राहील, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. परंतु, गेल्या दोन ते अडीच वर्षात कोरोनाचा जो मार जगाला बसला, त्याचा सर्वाधिक परिणाम झाला तो सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर! कारण, कोरोनाचे उपचार त्या काळात इतके महागडे ठरले, त्यामुळे जगातल्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक संपन्न असतानाही किंवा उच्च मध्यमवर्ग असतानाही त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोहोचली. ही आर्थिक झड पोहोचणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानावर देखील याचा परिणाम झाला. नागरिकांची खरेदी शक्ती कमी झाली. नागरिकांनी आनंदाच्या प्रसंगी अनेक गोष्टींना फाटा देत आपला आनंद कमी करून घेतला. या सगळ्या वास्तवाला ब्रिटिश सरकारने लक्षात घेतले. ब्रिटन सरकारने त्या अनुषंगाने त्यांच्या एका मंत्रालयाच्या माध्यमातून नागरिकांना जे आर्थिक दृष्ट्या कमजोर झाले आहेत किंवा जे आपले हप्ते वेळेवर भरू शकले नाहीत, जे सणासुदीला चांगला खर्च करू शकले नाहीत, जे नुकताच झालेला ख्रिसमस आणि नववर्षाची चांगले साजरे करू शकले नाहीत, त्यासाठी कपडे, चांगलं अन्न खरेदी करू शकले नाहीत, अशा जवळपास ६० लक्ष लोकांना ब्रिटन सरकारने थेट आर्थिक पॅकेज देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे. १ हजार ८४ डॉलर एवढी भरीव मदत या लोकांना केली जाणार आहे. अर्थात, ब्रिटन मधल्या कोणत्याही नागरिकांनी आपल्याला आर्थिक पॅकेज द्यावं किंवा सरकारने मदत करावी, अशी मागणी करत मोर्चे, धरणे किंवा कुठलेही आंदोलने केली नाहीत. परंतु, सरकारने देश म्हणजे देशातील जनता, यांची आर्थिक स्थिती पाहता स्वतःच हा निर्णय घेतला. वास्तविक, आपल्या भारताच्या बाजूला अतिशय चिमुकला असलेला हिमालयाच्या कुशीतील छोटा देश भूतान. या देशामध्ये नागरिकांचे जीवन हे आर्थिक निकषावर न मोजता, त्यांना वाटणाऱ्या आनंदावरून ते मोजलं जातं. कोणतीही व्यक्ती जर आर्थिक विवंचनेत असेल, संकटात असेल तर ती आनंदात राहू शकत नाही! त्यामुळे भूतान सारख्या छोट्या देशाचे अनुकरण युरोपमधल्या अनेक देशांनी आता सुरू केले आहे; आणि त्यामुळे युरोपमधल्या देशांनीही आपल्या देशाचा विकास मोजण्यासाठी नागरिकांचा आनंद हा इंडेक्स वापरण्याची पद्धती आता सुरू केली आहे. ब्रिटनने कोरोना काळानंतर आपल्या नागरिकांना जाहीर केलेल्या या आर्थिक पॅकेज मध्ये देखील हाच विचार प्रधान दिसतो. जर देशाची जनता सुखी – आनंदी नसेल तर त्यांच्या जीवनात नक्कीच आर्थिक संकटे आहेत आणि ती दूर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांना जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही, हे समीकरण म्हणजे एक प्रकारे माणसाचं जीवनाविषयी समाधान व्यक्त करून त्याच्या आर्थिक निकषालाही ते अभिव्यक्त करते असा होतो. आव्हानात्मक आर्थिक वातावरणात जीवन जगताना  संकटाशी झुंज देत असताना गेल्या वर्षी कमी-उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी बाराशे पौंड रोख दिले होते. याच कार्यक्रमाचे नवीनतम पॅकेज आता जाहीर करून ब्रिटनने माणूस केंद्रीत धोरण अवलंबिले आहे.

COMMENTS