Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये पूल कोसळून 2 बाईकसह ट्रक थेट नदीत

गांधीनगर ः गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील वस्तडी येथील 40 वर्षे जुना जीर्ण पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पूल कोसळला त्यावेळी पुलावरून जाणार्‍या ट्र

परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार
कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले

गांधीनगर ः गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील वस्तडी येथील 40 वर्षे जुना जीर्ण पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पूल कोसळला त्यावेळी पुलावरून जाणार्‍या ट्रकसह दोन दुचाकी नदीत पडल्या. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक पुलावरून जात असताना पुलाचा काही भाग तुटून खाली पडला. यामुळे ट्रक थेट भोगावो नदीत पडला. त्याचवेळी दोन दुचाकीही पुलावरून जात असल्याने त्याही पुलावरून खाली पडल्या. यात चार जण गंभीर जखमी झाले.

COMMENTS