Breking ! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Breking ! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई :  मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आल्याचे समजते. चौकशी संपल्यानं

श्रीमान गोकुळचंजी विद्यालयामध्ये माजी विद्यार्थीचा मेळावा उत्साहात
ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे : पालकमंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्र हादरला! किरकोळ वादातून मित्राची हत्या

मुंबई :  मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आल्याचे समजते. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर येत मलिक यांनी झुकेंगे नही लढेंगे अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी चौकशीसाठी मलिकांच्या घरात दाखल झाले होते. त्यानंतर मलिक यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज, बुधवारी सक्तवसुली संचलनालयाच्य (ईडी) टीमने धाड टाकली आहे. गुन्हे जगताशी संबंधीत आर्थिक व्यवहारप्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याची शक्यता आहे. ईडीचे अधिकारी आज, बुधवारी सकाळी 6 वाजता मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर सुमारे 1 तास मलिक यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सकाळी 7.30 वाजता नवाब मलिक यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

COMMENTS