Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वरुपखानवाडीच्या पाझर तलावाच्या भरावाला भेगा

गोंदवले / वार्ताहर : स्वरूपखानवाडी येथील मळवी पाझर तलावाचा भेगाळलेल्या भराव्यामुळे ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला असताना आपत्कालीन व्यवस्थापन

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल : कृषी मंत्री कोकाटे
काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी संपादीत जमिनींचा मोबदला कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
ड्रोन प्रणालीमुळे सागरी सुरक्षा होणार भक्कम : मंत्री नितेश राणे

गोंदवले / वार्ताहर : स्वरूपखानवाडी येथील मळवी पाझर तलावाचा भेगाळलेल्या भराव्यामुळे ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला असताना आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा बावीस तासानंतर दाखल झाली. संबंधित अधिकार्‍यांनी संपूर्ण तलावाची पाहणी करून दुरुस्ती बाबतचा अहवाल तयार केला आहे. परंतू डोक्यावर अद्यापही धोक्याची टांगती तालावर असल्याने गावकरी भेदरलेले आहेत.
अनेक संकटाचा सामना केल्यानंतर आता चांगल पिक पदरात पडेल असा विचार शेतकरी सारखा करत असताना माण तालुक्यातील स्वरुपखानवाडी येथील गावच्या जवळच असलेला मळवी पाझर तलाव फुटण्याचा स्थितीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाला कळवल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे आज सकाळी संबंधित अधिकारी तलावाच्या भरावावर पोचले. येथील मळवी पाझर तलाव सन 1972 च्या दुष्काळात तयार करण्यात आला आहे. कालांतराने तलाव खूप पाझरू लागल्याने 1999 मध्ये व 2017 मध्ये या तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर मात्र तलावाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या तलावाचा भराव खचण्यास सुरूवात झाली. सध्या या तलावाच्या भराव्याला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत.

COMMENTS