Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आंदोलनासाठी देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरीतून भाकरी-चटणीची शिदोरी

देवळाली प्रवरा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद

आयुष्याचे वास्तव चित्रण म्हणजे गझल -प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर
पाचोर्‍यात भरधाव वाहनाने चौघांना उडवले
आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत
Displaying 1000482713.jpg

देवळाली प्रवरा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लाखो मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मुंबईतील हॉटेल्स व अनेक दुकाने बंद असल्याने मराठा बांधवांवर अन्न-पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर “प्रत्येक घरातून एक शिदोरी” या  देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  देवळाली प्रवरा बाजारतळ व राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रविवारी  सकाळी मोठ्या प्रमाणात फरसाण, भाकरी-चपात्या, शेंगदाणा चटणी, पाणी बाटल्या व विविध खाद्यपदार्थ एकत्र करून गाडीभर साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते ,विविध जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS