Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्रम्हलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न 

त्र्यंबकेश्वर - येथे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जिल्हाधिकारी जलज शर्म

सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या
राजधानीत पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?

त्र्यंबकेश्वर – येथे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. हजारो साधू संतांसह साधारण पंधरा हजार भक्त वारकरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच सागरानंद  आश्रमाचे मुख्य महंत श्री शंकरानंद सरस्वती महाराज यांनी मूर्ती स्थपाना पूजेत मुख्य सहभाग घेतला. महामंडलेश्वर गणेशानंद सरस्वती, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, महामंडलेश्वर महामंडलेश्वर सुरेंद्र गिरी पूजेसह पूर्णाहूती  सोहळ्यात सामील होतें. पहिल्या दिवशी मूर्ती ग्राम प्रदक्षिणा, दुसऱ्या दिवशी मंदिरावर कलाशारोहण ,तर आज स्वामी सागरानंद यांची मूर्ती प्रतिष्ठापना झाली. प्रथम पुण्यस्मरण साजरे झाले. 

सिंहस्थ कुंभमेळ्यातील जाणकार तसेच महाराष्ट्रातील महान संत म्हणून स्वामी सागरानंद यांचे नाव भारतभर पसरलेले आहे. समाधी उत्सर्ग सोहळ्याने स्वामीजी आपल्यातच असल्याचा भास श्रद्धाळूना झाला. स्वामीजींचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प आनंद आखाडाच्या साधुमंहतांनी केला. या आखाड्याचे पुरोहित प्रमोद जोशी तसेच आचार्य ज्योतिष महागुरू पंकज शास्त्री घेवारे यांनी धार्मिक पूजा तसेच समाधी उत्सर्ग पूजेचे पौरोहित्य केले.

प्रवीण अडसरे सौ जयश्री आडसरे , आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार श्वेता संचेती, नगरपालिका प्रशासक सौ. देवचके, माजी नगराध्यक्ष कैलास घुले लक्ष्मीकांत थेटे,महंत गिरीजानंद, महंत सर्वानंद महाराज, महंत  केशवानंद, नवनाथ ,विकासानंद योगानंद , येथील विविध आखाडे आश्रम यांचे प्रमुख महंत, रामानंद सरस्वती महाराज , निरंजनी अखडा  महंत धनंजयगिरी महाराज तसेच रामेश्वर सोनी, मनोहर शिनगारे, कौशिक जोशी राहुल जोशी, विश्वनाथ घुगे, विक्रम नागरे ,पो.नि. शेवाळे आदि उपस्थित होते.

COMMENTS