Homeताज्या बातम्यादेश

एका पोरावर दोघींचा जीव जडला अन् राडा झाला ! पोरींची भररस्त्यात तुफान हाणामारी

सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट
कोल इंडियाचे सुदृढीकरण आवश्यक !
शेतकर्‍यांवर खोडसाळपणाने अन्याय करू नये-आ.संदीप क्षीरसागर

सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे व्हिडीओ पाहिले असेल पण तुम्ही कधी सार्वजानिक ठिकाणी दोन मुली एकाच बॉयफ्रेंडसाठी भांडण करत आहे, असे कधी पाहिले का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये दोन मुली एकाच बॉयफ्रेंडसाठी भर रस्त्यावर भांडताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुली एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. या दोघींच्यामध्ये एक तरुण दिसत आहे जो त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या मुली तरीसुद्धा एकमेकींना मारहाण करत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे आणखी एक मुलगी तुम्हाला दिसेल. ही मुलगी तरुणाला मारहाण करत आहे. ही संपूर्ण घटना राजकोट येथील एका रस्त्यावरील आहे. भर रस्त्यात या मुली भांडण करत असल्यामुळे लोकांची गर्दी झाली आहे. ते गुजराती भाषेत एकमेकांना बोलत आहे. एक मुलगी फोन मागत आहे पण दुसरी मुलगी फोन देत नाही. त्यावरुनच हे भांडण झाले आहे.

COMMENTS