महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना भारतरत्न द्यावा  : डॉ सुनील गायकवाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना भारतरत्न द्यावा : डॉ सुनील गायकवाड

लातूर/विशेष प्रतिनिधी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक पुरस्कार लातूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे माजी खासदार ल

लसीकरण विशेष मिशन ईंद्रधनुष 5.0″ लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक
सविता पिसाळ यांना पीएच.डी. पदवी

लातूर/विशेष प्रतिनिधी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक पुरस्कार लातूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे माजी खासदार लोकप्रिय संसद रत्न प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा राज्यसभेचे माजी प्राचार्य डॉक्टर जनार्धन वाघमारे, समाजवादी विचाराचे ज्येष्ठ नेते एडवोकेट मनोहरराव गोमारे, औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सुनील गायकवाड म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने दलित मागासलेल्या आणि महिलांची देशातली पहिली शाळा सुरू केली अशा महापुरुषांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार देऊन या दांपत्याचा गौरव करायला हवा अशी मागणी यावेळी डॉक्टर गायकवाड यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले ब्रिगेड आणि विश्व दलीत परिषद या सामाजिक संघटनेने एकत्र येऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांना एकत्र भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी सरकारला निवेदन देऊ आणि दिल्ली येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पण संघटनेच्यावतीने करून सरकारच्या लक्षात आणून देण्याचे काम हे करावे लागेल असे मत डॉक्टर गायकवाड यांनी व्यक्त केले. औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांनी आपल्या मनोगतात म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले हे जर नसते तर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला किंवा मी आज आमदार म्हणून या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नसतो हे सगळं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कामाची पावती आहे असे ते म्हणाले.
एडवोकेट मनोरा गोमारे यांनी या महात्मा फुले सामाजिक पुरस्कार कार्यक्रमा त्यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कामाच्या आणि विचारांच्या दिशेने आपण काम केले पाहिजे.
महाराष्ट्रातील 28 जिल्ह्याचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती महात्मा फुले ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग सैनिक हे उपस्थित होते. फुले ब्रिगेड चे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता चांबरगे यांनी या पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती विशेषता लातूर येथील ग्रीन लातूर चळवळ चालवणारे डॉक्टर लड्डा यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला विशेषता माझं लातूर या सोशल मीडियाच्या ग्रुपचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दूरदर्शन चे जिल्हा प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे डॉक्टर जे एम वाघमारे यांनी खासदार असताना राज्यसभेमध्ये लोकसभेच्या लायब्ररीमध्ये सावित्रीबाई चा पुतळा बसवण्याची मागणी केली होती परंतु त्यात काही यश आले नाही असे मत मांडले परंतु डॉक्टर सुनील गायकवाड त्यांनी केलेल्या मागणीचं समर्थन डॉक्टर विजय वाघमारे यांनी केले. महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचा हा पहिलाच कार्यक्रम लातूरमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमासाठी महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी झाली होती.

COMMENTS