Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोरामणी विमानतळ हा दुसरा पर्याय सोलारपूरकरांच्या दृष्टीने हिताचा ठरू शकतो – रोहित पवार 

सोलापूर प्रतिनिधी - कौटुंबिक मतभेदातूनविमानतळाचा मुद्दा उपस्थित करून राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत आहे. यामध्ये २७ हजार कुटुंबा

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे
हिंदूंनो, हिंदूत्वापासून सावध व्हा !
नगर शहरातील ओढे-नाले घेणार मोकळा श्‍वास

सोलापूर प्रतिनिधी – कौटुंबिक मतभेदातूनविमानतळाचा मुद्दा उपस्थित करून राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून होत आहे. यामध्ये २७ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह असणारा साखर कारखाना बंद व्हावा ही भावना दिसते. कारखानाही राहिला पाहिजे आणि विमानतळही व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. बोरामणी विमानतळ हा दुसरा पर्याय सोलारपूरकरांच्या दृष्टीने हिताचा ठरू शकतो, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गेली ५२ वर्षांपासून साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधार ठरलेल्या साखर कारखान्याच्या चिमणीवरुन गेली अनेक दिवसांपासून राजकारण सुरु आहे. यामागे मूठभर मंडळींचा सहभाग दिसतो. बोरामणी विमानतळासंबंधी असलेले प्रश्न विद्यमान खासदारांनी पाठपुरावा करुन सोडवला पाहिजेत, मात्र यात त्यांची सकारात्मकता यातून दिसत नाही. विमानतळासाठी फॉरेस्टच्या जागेची आडकाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र माझ्याही मतदारसंघात असा प्रश्न होता मात्र तो आम्ही कौशल्याने सोडवला. यामध्ये इच्छाशक्ती असायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्त करताना रोहित पवारांनी सध्या जे राजकारण चालले आहे ते व्यक्तीकेंद्रित आहे. हा सोलापूरकरांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही पवार यांनी केला

COMMENTS