Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे

श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिल

नंदुरबारमध्ये पालकांनी शाळेला ठोकले कुलूप
शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
कुर्डुवाडी-मिरज सेक्शनचे रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून पाहणी

श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिली पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसांच्या हातीमाथी पुस्तके वितरित करून त्यांच्या वाचनसंस्कृतीला दिशा देऊन त्यांची वाचनभूक जपली पाहिजे, असे मत रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले मराठी विषयाचे प्रा. विलासराव शिवाजीराव तुळे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विविध व्यक्ती, संस्था, गावोगावी मोफत पुस्तके भेट योजना प्रसंगी प्रा. तुळे बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार्‍या उपक्रमाचे महत्त्व डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले. ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही भूषणावह झाले, आपली भाषा, आपली माणसे, आपली, आपली अस्मिती आपण जपली पाहिजे, प्रतिष्ठित केली पाहिजे, त्यासाठी अहिल्यानगर जिल्हयासह राज्यात असे पुस्तकभेट उपक्रम, योजना, पुस्तक प्रकाशने, परिसंवाद आदितून अभिजात मराठी भाषेला सूज्ञ वाचकांसह, सर्वसामान्य वाचकांना या चळवळीत सहभागी करून घेतले पाहिजे . प्रा. तुळे यांनी वाचन संस्कृतीतर्फे उपयोजित उपकमांचे कौतुक केले. यावेळी भानसहिवरे येथील भाऊसाहेब देवतरसे परिवार, जोहरापूर येथील वीटभट्टीवरील तुकाराम खंडाळे, गोरख खंडाळे, कमल खंडाळे, सुमन खंडाळे, सुशीलाताई खंडाळे यांना पुस्तके मिळाल्यानंतर अतिशय आनंद व्यक्त केला. सुशीलाताई खंडाळे म्हणाल्या, आम्ही वीटभट्टी कामे करतो पण वाचन संस्कृतीने पुस्तके दिल्यामुळे घरातील सर्वजण पुस्तके वाचतो, डॉ. उपाध्ये यांचे माकडांच्या हाती शाळेची खिचडी, टांगा पल्टी घोडे फर्रार, भारतीय कुंभार समाजातील संत अशी अनेक पुस्तके आवडीने वाचली, घरात पुस्तके असल्याने आमची मुले टीव्ही पाहण्यापेक्षा पुस्तके वाचतात त्यासाठी घरात पुस्तके हवीत असे मत व्यक्त केले. आदिनाथनगर येथील, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांनाही पुस्तके भेट देण्यात आली सर्वांनी आनंद व्यक्त केला. प्रा. तुळे यांनी आजची वाचन संस्कृती आणि अभिजात मराठी भाषा यांचे जतन आणि संवर्धन याविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS