मुंबई : फरार बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या
मुंबई : फरार बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमृता यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्या अनिक्षा जयसिंघानीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही अनिल जयसिंघानीची मुलगी आहे.
फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचे सांगत मदत करण्याची मागणी केली. त्याबदल्यात एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्नही केला होता. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी तक्रार केल्यानंतर आता अनिक्षाला अटक करण्यात आलीय. बुकी अनिल जयसिंघानी फरार होता. आता त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली. एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
COMMENTS