Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन समारंभ व परिसंवाद

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक वाडे व घराणे

रस्त्याच्या मागणीसाठी कारेगाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा : पालकमंत्री नितेश राणे
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सहकार पॅनलचे व्यापारी मतदारसंघातून दोघे उमेदवार विजयी

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक वाडे व घराणे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी दिली आहे.
      याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संगमनेर आणि आय.क्यू. ए. सी व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुमित डेंगळे लिखित ऐतिहासिक वाडे व घराणी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 9 वा. केबी देशमुख सभागृह येथे करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे, प्राचार्य डॉ शिरीष लांडगे हे मान्यवर सहभागी होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आ.डॉ. सुधीर तांबे हे असणार आहे.
   तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्था पदाधिकारी, प्राचार्य ,उपप्राचार्य, डॉ त्रिंबक राजदेव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी रुंद , एस एम बी टी महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS