मुंबई प्रतिनिधी - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. आता पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून एका माथेफिरु

मुंबई प्रतिनिधी – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली जात आहे. आता पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून एका माथेफिरुने बॉम्बहल्ल्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे अशी धमकी दिली जात आहे. दोन दिवसांपूर्वी एकाने पोलिसांना फोन करून २६/११ सारख्या हल्ला करण्याची धमकी दिल्याची घटना ताजी असतांना आता पुन्हा मुंबईत बॉम्बहल्ला करण्याची धमकी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
COMMENTS