नागपूर : सोशल मीडियाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयही स्वत: अपडेट करत आहे. या शृंखलेत उच्च न्यायालयाने टेलिग्रामवर स्वत:चा चॅनल
नागपूर : सोशल मीडियाची वाढती व्याप्ती लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयही स्वत: अपडेट करत आहे. या शृंखलेत उच्च न्यायालयाने टेलिग्रामवर स्वत:चा चॅनल सुरू केला आहे. 8 नोव्हेंबरला याबाबत न्यायालयीन प्रशासनाने परिपत्रक काढले. उच्च न्यायालयाच्या टेलिग्राम चॅनलवर रोजच्या कारवाईबाबत माहिती प्रसारित केली जाईल. याशिवाय ज्या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी होत आहे अशा प्रकरणांची लिंकदेखील यावर पुरविली जाईल. मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य खंडपीठासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही चॅनलवर दिली जाईल. टेलिग्राम चॅनलवर डेटा सेव्ह करण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
COMMENTS