राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला

कन्नूर : केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील पय्यनूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी बॉम्ब हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे पोल

राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज
टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येणार
जेईई मेन निकाल जाहीर 

कन्नूर : केरळच्या कुन्नूर जिल्ह्यातील पय्यनूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी बॉम्ब हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनच्या अतिशय जवळ असूनही या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जातेय. अशा प्रकारच्या हल्ल्यांना रोखण्यात राज्य व्यवस्थापन अयशस्वी झाल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना धोकादायक आहेत. पोलीस स्टेशन अगदी 100 मीटर अंतरावर असतानाही अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. हे दुर्लक्ष नाही तर अपयश आहे. या सगळ्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्रातील कांदिवली मतदार संघाचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा बॉम्ब हल्ला केरळच्या डाव्या सरकारने पोसलेल्या कट्टरतावाद्यांचा कारनामा आहे. केंद्र सरकारने या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पोशिंद्यांना ठेचून टाकावे, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.

COMMENTS