Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलीवूडची अभिनेत्री सनी लिओनी दुखापत ग्रस्त झाली

अभिनेत्री सनी लियोनी ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सनीच्या पायाला जखम झाल्याचे आणि त्यातून रक्त येत असल्याचे दिस

“‘या” जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा परवाना निलंबित करण्याचा मनपाचा इशारा
दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू
पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अभिनेत्री सनी लियोनी ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सनीच्या पायाला जखम झाल्याचे आणि त्यातून रक्त येत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सनी खूपच घाबरलेली असून तिचे इतर लोक जखम साफ करण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु, सनी इजेक्शनचे नाव घेताच जोरजोरात ओरडताना दिसतेय. शेवटी मात्र, सनीचा हात पकडून जखम साफ केली जाते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘कोटेशन गँग या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी माझा अपघात झाला आहे. माझ्या पायाला जखम झाली असून वेदना होते आहेत. माझी सेटवर काळजी घेतली जात आहे.’ असे लिहिले आहे. यावरून कोटेशन गँगच्या शूटिंगदरम्यान सनी जखम झाल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी सनी तब्येतीची काळजी करत कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘काळजी घे’, ‘दुखापत हिला झाली आहे आणि त्रास मलाच होत आहे’. असे म्हटलं आहे.

COMMENTS