Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीच्या रडारवर बॉलीवूडचे कलाकार

महादेव अ‍ॅप घोटाळाप्रकरणी 417 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई/प्रतिनिधी ः ऑनलाईन बेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून हजारो कोटी रूपये काही कंपन्या परदेशात पैसा नेत असल्याचे समोर आल्यानंतर मनी लॉड्रिंगच्या कायद्

लग्नाचं आमिष दाखवत तरुणीला 14 लाखाला गंडवलं | DAINIK LOKMNTHAN
अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती
हिजाबला परवानगी देण्यास कर्नाटक सरकारचा नकार

मुंबई/प्रतिनिधी ः ऑनलाईन बेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून हजारो कोटी रूपये काही कंपन्या परदेशात पैसा नेत असल्याचे समोर आल्यानंतर मनी लॉड्रिंगच्या कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कारवाई करण्यास सुरूवात केली असून, महादेव अ‍ॅप घोटाळाप्रकरणी ईडीने शुक्रवारी 39 ठिकाणी छापेमारी केली असून, या प्रकरणात अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अनेक अभिनेत्री अडकल्याचे समोर आले आहे. यामध्येअभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी यांच्यासह अनेक कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.
ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापेमारी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग अँपशी सबंधित ही सर्वात मोठी कारवाई केली असून यामध्ये तब्बल 417 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बडे अभिनेते रडारवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ईडीने ऑनलाइन जुगार ऍप महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग अ‍ॅपचे प्रमोटर असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. याप्रकरणी ईडीने कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथे छापे टाकले. या छापेमारीत ईडीने तब्बल तब्बल 417 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. यामध्ये गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी 18 लाख रोख रक्कम आणि 13 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.महादेव बेटींग अँपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रेटी आणि सरकारी अधिकार्‍यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

या दिग्गज कलाकारांचा समावेश – या प्रकरणात 14 पेक्षा अधिक बडे बॉलिवूड सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंग,नुसरत भरुचा,आतिफ अस्लम यासह अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे.

COMMENTS