Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई/प्रतिनिधी ः ठाण्यातील मासुंदा तलावात मंगळवारी (12 सप्टेंबर 2023) सकाळी एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. य

बेलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
डॉक्टर उशिरा आल्याने निष्पाप बालकाचा आईच्या कुशीत मृत्यू.
महापौरपदासाठी शिवसेनेच्या शेंडगे रिंगणात दाखल ; उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा आज अर्ज येणार

मुंबई/प्रतिनिधी ः ठाण्यातील मासुंदा तलावात मंगळवारी (12 सप्टेंबर 2023) सकाळी एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास मासुंदा तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची माहिती मिळाली. यानंतर बचाव पथकाने महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल. सदर वयोवृद्ध महिला ही अंदाजे 65 ते 70 वयोगटातील असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील मासुंदा तलावजवळ संध्याकाळी लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या तलावाच्या शेजारी मोठी बाजारपेठ आणि भाजी मार्केट आहे. यामुळे मासुंदा तलाव हा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, तरीही ही महिला पाण्यात पडली कशी? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

COMMENTS