Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात

तब्बल 108 रक्तदात्यांनी केले रक्तदान

संगमनेर ः संगमनेर येथील कुंथूनाथ सोसायटी या ठिकाणी जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या वतीने सोमवार दि. 27 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या र

जामखेड पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर

संगमनेर ः संगमनेर येथील कुंथूनाथ सोसायटी या ठिकाणी जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या वतीने सोमवार दि. 27 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कर्तव्यम फाउंडेशनचे संस्थापक तुषार ओहरा म्हणाले की, समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या प्रामाणिक भावनेतून जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या वतीने दोन दिवसात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे रक्तदान शिबिराचे पहिलेच वर्ष असून इतक्या कमी वेळात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दरवर्षी हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांची 750 रुपयांची असलेली शरीराची विविध तपासणी ही संघाच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे. यामध्ये सिबिसी, मधुमेह (शुगर), युरिक ऍसिड, क्रीटीनाईन, कोलेस्ट्रॅाल, एसजीपीटी, ब्लड ग्रुप अशा प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच संगमनेर सह राज्यातील विविध सामाजिक संघटनांनी अशा प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित करून अपघातग्रस्तांना मदत करावी जेणेकरून दररोज लागणारे रक्त हे कमी पडणार नाही असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.यावेळी अर्पण ब्लड बँक यांचे मोलाचे योगदान लाभले.हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जैन श्‍वेतांबर मुर्तीपुजत संघ, संगमनेर मधील सर्व पदाधिकारी सदस्य व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS