Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात बांधकाम कामगारांची अडवणूक

ग्रामसेवकाविरूद्ध आज आंदोलन करण्याचा इशारा

अकोले ः भारतीय दलित महासंघाच्या संघटनेचे सभासद असणारे अनेक बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. बांधकाम कामगारांचे कार्ड नुतनीकरणासाठी आलेले

BREAKING:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना घेऊन येणाऱ्यास ५००० बक्षीस |Lok News24
BREAKING: आता नगरमधील २६ खासगी रुग्णालयांची लूटमार थांबणार, रुग्णांना दिलासा | Lok News24
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

अकोले ः भारतीय दलित महासंघाच्या संघटनेचे सभासद असणारे अनेक बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे. बांधकाम कामगारांचे कार्ड नुतनीकरणासाठी आलेले आहे.
संबंधित कामगारांचे कार्ड नुतनीकरण होणे खूप गरजेचे आहे. परंतु सदर कामकागारांचे कार्ड नुतनीकरणासाठी त्या त्या गावातील संबंधित ग्रामसेवक अडथळा निर्माण करीत आहे अर्जावर सही शिक्के देण्यास नकार देत आहे. त्यामुळे कामगारांचे खुप मोठे नुकसान होत आहे. ग्रामसेवकांचे आडमुठे धोरणामुळे सदर कामगारांचे कार्ड नूतनीकरण होण्यास अडचण तयार होत आहे. ग्रामसेवक  संघटनेच्या आडून  सही व शिक्का देण्याचे अडवणूक करत आहेत त्यांना तातडीने  आदेश करावे व कामगारांना न्याय मिळवून देण्यात यावा. अन्यथा भारतीय दलित महासंघाच्यावतीने गुरुवार 08 ऑगस्ट  रोजी अकोले गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण असा इशारा भारतीय दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खरात यांनी दिला आहे.

COMMENTS