Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकर्‍यांचे रास्ता रोको

देवळाली प्रवरा ः राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्ग अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

गौराईच्या स्थापनेत साकारला चंद्रयान-3 चा देखावा
मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण
पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक

देवळाली प्रवरा ः राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्ग अडवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी लाभ धारक शेतकर्‍यांनी भर उन्हात अर्ध नग्न होत नगर-मनमाड महामार्गावर बोंबा बोंब करत ठिय्या आंदोलन केले.माञ या आंदोलनाची आ.प्राजक्त तनपुरे यांनीच काल राहुरी तहसिल कार्यालयात आंदोलनाची घोषणा केली.आणि त्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरविली.त्यामुळे माञ शेतकरी व कार्यकर्त्यामध्ये संभ्रमण आवस्था निर्माण झाली होती.अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी पुढाकार घेवून नगर मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. पिके जगविण्यासाठी पाण्याची अवश्यकता आहे.आमची पिके पाण्या अभावी उन्हाच्या तीव्रतेने जळत आहे.आम्ही शेतकरी अर्ध नग्न होवून उन्हाच्या चटक्याने मरतो, आम्ही मेल्यावर व पिके जळाल्यावर पाणी देणार असाल तर नगर मनमाड महामार्गावर आमच्या शेतकर्‍यांना जिव सोडू द्या.अशा प्रकारे संतप्त शेतकर्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.             

शेती पिक,पशुधन वाचवण्यासाठी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. गुरवारी तहसिल कार्यालयात आ.प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले.पाणी सोडण्याचा निर्णय सायकाळ पर्यंत न झाल्यास शुक्रवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावर जनावरांसह शेतकरी चक्काजाम आंदोलन करतिल असा इशारा आ.तनपुरे यांनी दिला होता. माञ या आंदोलनाकडे आ.तनपुरे यांनीच पाठ फिरविल्यामुळे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली  लाभ धारक शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागले.नगर मनमाड महामार्गावर शेतकरी अर्ध नग्न होवून बोंबा बोंब करत ठिय्या आंदोलन करुन  महामार्ग अडविण्यात आला. महामार्गावर  वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरवारी पाटबंधारे विभागाने  निवेदन स्वीकारुन सायंकाळ पर्यंत निर्णय जाहिर करण्याचे आश्‍वासन तहसिलदार नामदेव पाटील व पाटबंधारेचे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील, मुळा डावा कालवा अभियंता अच्चुत गिते यांनी दिले होते.अधिकार्‍यांच्या आश्‍वासनावर शेतकर्‍यां तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले होते.माञ सायंकाळ पर्यंत पाणी सोडण्याचा सकारत्मक निर्णय न झाल्यास शुक्रवारी नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा जनावरांचा गुरा ढोरांसह आंदोलन करण्याचा इशारा आ.तनपुरे यांनी दिला होता. माञ या आंदोलना पासुन आ.तनपुरे दुर राहिल्याने उपस्थित शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.आंदोलन करुनही सरकारने आमच्या व्यथा समजून न घेतल्यास यापुढील  आंदोनात शेतकरी हातात दंडुके घेतीला ?असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.यावेळी आंदोलकांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  रवींद्र मोरे यांनी संतप्त भावना व्यक्त करताना सरकारने शेतकर्‍यांना उघडे केलेच आहे तर मग अर्धनग्न होवूनच आंदोलन करावे लागणार आहे.आमच्या हक्काचे पाणी द्या चारा पिके वाचवा तरच पशुधन वाचणार आहे.पशुधन वाचले तरच शेतकर्‍यांच्या हातात पैसे राहणार आहे.नाहीतर शेतकरी मेल्या शिवाय राहणार नाही.तीन एमसीएफटी पाणी चारा पिंकासाठी देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पाटबंधारेचे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील, मुळा डावा कालवा अभियंता अच्चुत गिते उपस्थित होते. शेतकर्‍यांच्या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार संध्या दळवी व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्वीकारले.यावेळी दिलीप इंगळे, संजय पोटे,विजय तमनर, प्रकाश भुजाडी,सुनिल इंगळे,महेश उदावंत,सतिष वाळूंज, बाळासाहेब खुळे,ज्ञानेश्‍वर खुळे,आनंद वने,अक्षय वने,सचिन वराळे,राहुल काळे, संतोष आघाव, जर्नादन वने आदींह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS