Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी हक्क संघर्ष समितीचा रास्ता रोको

हिंगोली ः जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुर

उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह
महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पुन्हा अपघात
नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

हिंगोली ः जिल्ह्यातील धरणे व नद्यांचे पाणी पळवणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात पाणी हक्क संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा येथे शेकडो ग्रामस्थांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग रोखला. या आंदोलकांनी हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्ग तब्बल तासभर रोखून धरला. यावेळी आंदोलकांनी सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. या रास्ता रोको आंदोलनामुळे हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती. या रास्ता रोको आंदोलन दरम्यान प्रशासनाने आंदोलकांची भेट घेतली.

COMMENTS