अकोले/प्रतिनिधी ः मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांचे वैद्यकीय व्यवसायिकांना आशीर्वाद मिळतात.हे आशीर्वाद जीवनात महत्वाचे असल्याचे

अकोले/प्रतिनिधी ः मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांचे वैद्यकीय व्यवसायिकांना आशीर्वाद मिळतात.हे आशीर्वाद जीवनात महत्वाचे असल्याचे प्रतिपादन अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त हभप दिपक महाराज देशमुख यांनी केले. प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब खरात,उद्योजक रोहिदास धुमाळ,उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व नगरसेविका शितल वैद्य यांच्या पुढाकारातुन व संकल्प ऍक्युपंक्चर अँड पॅरालिसिस सेंटर च्या वतीने आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन येथील महालक्ष्मी मंदिरात करण्यात आले होते. शिबिराचे सांगता समारंभात हभप दीपक महाराज देशमुख बोलत होते. यावेळी श्रीमंत लॉन्स अँड मंगल कार्यालयाचे संचालक,भाजप चे नेते रोहिदास धुमाळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धकला हॉस्पिटलचे डॉ.अवस्थी, संकल्प संस्थेचे डॉ प्रभाकर खर्डे, कैलास रहाणे, प्रज्ञा रहाणे, सेवा निवृत्त शिक्षक दत्तात्रय वाणी, साहेबराव धुमाळ, विशाल खरात,मंगेश भरीतकर,संपत गायकवाड यांचेसह परिसरातील रुग्ण आदी उपस्थित होते.प्रास्तविक,सूत्रसंचालन अमोल वैद्य यांनी करत शेवटी आभार मानले.
COMMENTS