Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

जामखेडमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड ः सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पोस्ट का करतो, असे म्हणत भाजपचे जामखेड तालुका सोशल मीडियाप्रमुख उध्दव हुलगुंडे यांना मारह

पाटणकर विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश
लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…
अहिल्यादेवींच्या भव्य स्मारकासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे

जामखेड ः सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पोस्ट का करतो, असे म्हणत भाजपचे जामखेड तालुका सोशल मीडियाप्रमुख उध्दव हुलगुंडे यांना मारहाण केल्याप्रकरणी दादा राळेभात व सागर या दोघांवर भारतीय न्याय संहिता 2023 309(6) नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उध्दव हुलगुंडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की 29 ऑगस्ट रोजी 1ः00 वा. सुमारास मी जामखेड येथे आ. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात असतांना माझ्या मोबाईलवर 9096248302 या मोबाईल नंबर वरुन फोन आला तो फोन मी उचलल्यानंतर समोरुन मी सागर मराठा बोलतोय परवा जामखेडमध्ये काय धिंगाणा होतोय पाहात राहा असे बोलून फोन कट केला. 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 04 ः30 वा. सुमारास मी भाजी मंडई येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी बीड रोड येथील पुजा साडी सेंटरचे दुकानासमोर माझी मोटार सायकल लावून भाजीपाला खरेदी करण्यासठी मंडईत गेलो. भाजीपाला खरेदी करुन मी परत सायंकाळी 05 ः 00 वा. सुमारास मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी येवून भाजीपाल्याची पिशवी मोटार सायकलला लटकवत होतो. त्याचवेळी अचानकपणे एक इसम आला व त्याने मला पाठीमागून येवून कवळ घातली त्याच वेळी सागर मराठा हा तेथे आला व त्यांनी माझ्या वरील खिशात घात घालून बळजबरीने खिशामध्ये असलेले मोबाईल व तीन हजार रुपये काढून घेवून तीन हजार रुपये सागर मराठा यांनी त्याचे पॅन्टच्या खिशात घातले व मोबाईल त्याचे हातामध्ये ठेवून मला म्हणाला की, मॅचोद तिन दिवसापूर्वी फोन करुन तुला सांगितला होते, तरी सुध्दा तु रोहित दादा पवार यांचे विरुध्द सोशल मिडीयावर पोस्ट का टाकत आहे.? असे म्हणून त्यांनी त्याचे हाताने माझ्या तोंडावर एक बुका व चापट हाणली त्यावेळी मी सागर मराठा यांचे हातात असलेला माझा मोबाईल हिसकावून घेतले. त्यावेळी मी झटापट करत असतांना सागर मराठा यांने परत आगावपणा केला तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून तेथून पळून गेला. त्यानंतर मला कवळ घातलेला दादा राळेभात हा मला म्हणाला की, मी विकास तात्या राळेभात याचा भाऊ आहे तुला मिटवायचे आहे का नाही.? तेव्हा मी त्याला म्हणालो की, तुझा माझा काय संबंध नाही मला सोड असे म्हणालो असता दादा राळेभात हा मला सोडून जोरात तेथून पळून गेला आहे. उध्दव हुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दादा राळेभात व सागर मराठा या दोघांवरभारतीय न्याय संहिता 2023 309(6) नुसार गून्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत

COMMENTS