ठाणे प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा - बाळासाहेबांची शिवसेना युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देव
ठाणे प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजय झाल्यामुळे भाजपच्या खोपट कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालुन नृत्य करीत विजय साजरा केला. याप्रसंगी दोन्ही आमदारांसह प्रदेश सचिव संदीप लेले , मा. नगरसेवक कृष्णा पाटील, संजय वाघुले, सुनेश जोशी, स्नेहा रमेश आंब्रे , भरत चव्हाण, विकास पाटील, सीताराम राणे , ओमकार चव्हाण रोहिदास मुंडे, सचिन पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या सहा महिन्यांच्या काळात युती सरकारने शिक्षकांना ११०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यासह शिक्षकहिताचे विविध निर्णय घेतले. या कार्याचा शिक्षकांनी सन्मान केला आहे. या निवडणुकीतील प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह युतीचा कोकणातील प्रत्येक कार्यकर्ता हा विजयासाठी झटत होता. या सर्वांच्या श्रमाचे आजच्या विजयाने चीज झाले. शिक्षक मतदारसंघात वसंतराव बापट, सुरेश भालेराव, प्रभाकर संत, रामनाथ मोते अशी आमदारांची समृद्ध परंपरा लाभली होती. नवनिर्वाचित उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने ही परंपरा आता पुन्हा सुरू होईल, असा विश्वास वाटतो. कोकण शिक्षक मतदारसंघाचा भाजपा-शिक्षक परिषदेचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकला अशी प्रतिक्रिया आ. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. तर, आ. संजय केळकर यांनी कोकणातील हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला सणसणीत चपराक असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS