Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस निरीक्षक संजय हारुगडे बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक

आत्मदहनाचा प्रयत्न; पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरसह तालुक्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्या

रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी नऊ चालकांविरुध्द गुन्हा दाखल
सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे 20 मेगावॅटच्या वीज निर्मिती उपकेंद्रास मंजूरी
सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख ; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा

आत्मदहनाचा प्रयत्न; पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरसह तालुक्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांना पोलिस अधिकार्‍यांचेच पाठबळ आहे, असा आरोप करत येथील पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या बदलीसाठी आक्रमक झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांशी झटापट करण्यापर्यंत हा राडा झाला. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक विक्रमभाऊ पाटील यांनी शहरात खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत मटका जुगाराच्या चिट्ट्या जोडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन पाठवले होते. त्यामध्ये 24 मार्चपूर्वी निरीक्षक हारुगडे यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. बदली न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा पवार यांनी दिला होता.
त्यामुळे विक्रम पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या आशा पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जमल्या होत्या. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिला पोलिसांची संख्या मोठी होती. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्याकडून हारुगडे यांच्या बदलीचा आग्रह धरला जात होता. वरीष्ठ अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी यावे, अशी मागणी केली जात होती. याचवेळी अंगाला हात लावायचा नाही असा दम महिला कार्यकर्त्यांकडून टाकला जात होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण झाले होते. या तापलेल्या आणि गोंधळाच्या वातावरणातच कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर डिझेल ओतून घेतल्यावर पुन्हा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या झटापटीला सुरुवात झाली. पोलिसांनी कॅन हस्तगत करून अनर्थ टाळला. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

COMMENTS