Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी भाजप चित्रा वाघ, दानवे, मुंडे यांना देणार संधी

मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून, या जागांसाठी अनेक जण इच्छूक असले तरी, भाजपकडून विधानसभेच्या दृष्टीने अनेकांना संधी देण्यात

वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर शाकिब हसनला चाहत्यांकडून मारहाण ?
पवार आणि मुंडे मध्ये रंगले शाब्दिक युद्ध | LOK News 24
शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा

मुंबई ः विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून, या जागांसाठी अनेक जण इच्छूक असले तरी, भाजपकडून विधानसभेच्या दृष्टीने अनेकांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रातील नेत्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या 10 नावांमध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक, यांच्या नावाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र भाजपचे केंद्रातील वरिष्ठ नेते कुणाच्या नावाला हिरवा कंदील दाखवतात, ते पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल. जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबते सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपले गणित पक्के असल्याचे सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक वक्तव्यही केले आहे.

COMMENTS