Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी-कडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

बीड प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. बीडच्या आष्टी-कडा बाजार समितीवर भाज

वारकऱ्यांवर लाठीमार एक अन्वयार्थ !
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
कुकडीच्या पाणीप्रश्‍नावर आंदोलन करणार्‍या चौघांना अटक

बीड प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. बीडच्या आष्टी-कडा बाजार समितीवर भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 18 जागांपैकी 12 जागा धस यांच्याकडे आहेत. तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना 3 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत धक्का बसला आहे. आजबे यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत बाजार समितीवर सुरेश धस यांची म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता आली असून भाजपची राज्यातली पहिलीच बिनविरोध निवडणूक आहे. 

COMMENTS